Bhima Koregaon Violence : नागपूर विद्यापीठातील शोमा सेन यांच्या घरी पोलिसांचा छापा

Request to District Collector to inquire about Bhima Koregaon riots

टीम महाराष्ट्र देशा : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी आज पोलिसांची धडक कारवाई सुरु असून नागपूर विद्यापीठातील शोमा सेन यांच्या घरीही पोलिसांनी छापेमारी केली आणि त्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर महेश राऊत यांनाही नागपुरातून अटक करण्यात आली आहे. पहाटेपासूनच ही कारवाई सुरू आहे.

राणा जेकब नावाच्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल च्या मदतीने अटक केली आहे. पटियाला कोर्टाने त्याला दोन दिवसांच्या ट्रांजिक्ट रिमांडवर रवानगी करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Loading...

सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.परिषदेत चिथावणीखोर भाषणं आणि गाण्यांमुळे भीमा-कोरेगाव दंगल भडकल्याचा आरोप होता. या आयोजनामागे माओवाद्यांचा काही संबंध आहे का याची चाचपणी पुणे पोलिस करत आहेत. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथर कार्यकर्त्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले होते. पुण्याचे सह-पोलीस आयुक्त आणि नक्षलविरोधी अभियानाचे माजी पोलिस महानिरिक्षक रविंद्र कदम यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरु आहे.

काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव-भीमामध्ये ता.1 जानेवारी 2018 रोजी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'