कोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

टीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित  आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या पाच जणांविरुद्ध आणि पाच फरार असलेल्या आरोपींविरुद्ध 5,160 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहा जूनला अटक झालेल्या सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन आणि फरार असलेले कॉम्रेड मिलिंद तेलतुंबडे, किशनदा बोस, प्रकाश उर्फ ऋतुपर्ण गोस्वामी, कॉम्रेड दीपू आणि कॉम्रेड मंगलू यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील रहिवाशी तुषार दामगुडे यांनी ८ जानेवारी रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. त्यावेळी त्यांनी रिपब्लिकन पँथरच्या हर्षाली पोतदार आणि सुधीर ढवळे यांची नावे घेतली होती तसेच कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर आणि ज्योती जगताप यांची नावे घेतली होती.सीपीआय-माओवाद्याच्या रणनितीनुसार आरोपींनी दलितांची दिशाभूल करुन त्यांच्या मनात हिंसाचाराचा विचार पसरवले असा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला होता.

Rohan Deshmukh

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मण केंद्रीत अजेंड्याच्या विरोधात दलित समाज गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्या माध्यमातून अटकेतील आरोपींनी केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्णपरिणाम असून, सीपीआयची (एम) पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी ६ जून रोजी विल्सन, गडलिंग, सेन, राऊत आणि ढवळे यांना अटक केली. एल्गार परिषदेला संशयितांनी निधी पुरवला असा आरोप पोलिसांनी केला आहे. सर्वांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कलमाअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. २८ ऑगस्टला दुसऱ्या टप्प्यात पोलिसांनी सुधा भारद्वाज, वरवरा राव, वर्नन गोन्सालविस, अरुण फरेरा आणि गौतम नवलखा या पाच प्रख्यात कार्यकर्त्यांना सीपीआय माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन अटक केली.

औरंगाबाद – दंगलीचा दुसरा बळी; सतरा वर्षीय मुलगा ठार

Latur Advt
You might also like
Comments
Loading...