नक्षल कनेक्शन; आरोपींच्या नजरकैदेत वाढ

पुणे : भीमा कोरेगाव दंगलीला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एल्गार परिषदेतील ‘त्या’ पाच जणांची नरजकैद १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत त्या पाचजणांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता.

पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार, नक्षल कनेक्शन आणि बेकायदेशीर व्यावहाराच्या आरोपांखाली या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्टला त्यांना अटक केली असून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता महाराष्ट्र सरकारकडून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत.

नक्षलवादी समर्थकांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

पोलिसांनी सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीस आणि वरवरा राव यांना अटक केली होती. मात्र या आरोपींना अटक न करता केवळ नजनकैदेत ठेवण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का दिला होता.