कोरेगाव भीमा दंगल; आरोपींवर कारवाईसाठी आंबेडकरी जनतेचे आंदोलन

पुणे : कोरेगाव भीमा येथे समाज कंटकांनी दंगल घडवून आणली होती. ही दंगल घडविणाऱ्या संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांना पोलिसांनी अटक करावी, या मागणीसाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्यावतीने आंदोलन करत निषेध करण्यात आला.

भीमा कोरेगाव येथे एकबोटे, भिडे यांनी तरुणांची माथी भडकावून दंगल घडवून आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दलित समाज आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम या सरकारने केले असून देशातील महत्वाच्या प्रश्नावरील जनतेचे लक्ष हटवण्याचे काम या दंगलीतून केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांना पोलिसांनी अटक करावी, सरकारने या दोघांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता, निपक्ष खटला चालवावा, अशी मागणी अर्जुन डांगळे यांनी केली आहे.