आपण छत्रपती घराण्याचे वंशज, मराठीतून निवेदन करु द्या ; खा.संभाजी राजे यांचे राज्यसभेतून शांततेचे आवाहन

जे झालं ते झालं आता शांतता राखा : शरद पवार

नवी दिल्ली: भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद आज राज्यसभेमध्ये देखील पाहायला मिळाले. खासदार संभाजी राजे यांनी मराठीमध्ये निवेदन करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील अशा परिस्थिती मध्ये सर्वांनी सामंजस्याने वागून शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी भूमिका मांडली.

राज्यसभेत काय म्हणाले छत्रपती संभाजी राजे
आपण छत्रपती घराण्याचे वंशज आहोत, कृपया मला मराठीतून निवेदन करु द्या अशी विनंती करतो. आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्ना ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी अठरापगड जाती आणि बहुजन समाजाला एकत्रित भूमिका सर्वांनी घेतली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शांतता राखावी.

जे झालं ते झालं आता शांतता राखा : शरद पवार
दर वर्षी भीमा कोरेगांव येथे अनुयायी येतात याच वर्षी असे काय झाले की, लोकांमध्ये अशांतता पसरली. भीमा कोरेगाव येथे दलित व्यक्तिच्या समाधीवर हल्ला झाला. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या समाजातील लोकांनीही हल्ला केल्याने वाद निर्माण झाला. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज होती पण आता जे झालं ते झालं सर्वांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत.’ सर्व समाजातील लोकांनी यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.