fbpx

भीमा-कोरेगाव शौर्यदिन : आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोलमाफ

पुणे: भीमा-कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो आंबेडकरी जनतेची भावना लक्षात घेऊन रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार वाहनांना टोल माफ करण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोलमाफ होणार आहे.

भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी राज्यातल्या विविध भागांमधले नागरिक मोठ्या संखेने १ जानेवारी रोजी येत असतात.ब्रिटिश आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात कोरेगाव भीमा येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. या विजयाची साक्ष म्हणून ब्रिटिशांनी कोरेगाव भीमा येथे ‘विजयस्तंभ’ उभारला आहे. पेरणेफाटा (ता. हवेली) येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून दलित बांधव दरवर्षी येथे येत असतात. मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा करतात.त्यामुळे आंबेडकरी अनुयायांना भीमा कोरेगाव येथे जाण्यासाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.