भीमा-कोरेगाव प्रकरण : मिलिंद एकबोटेंना चार दिवसांची पोलीस कोठडी

पुणे-भीमा-कोरेगाव येथे जाळपोळ आणि तोडफोड केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना शिरुर तालुका न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकबोटेंना आता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल. शिरूर तालुका न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकबोटेंची सुटकेची आशा मावळली आहे.

दरम्यान यापूर्वी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आलेली आहे. दंगल भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अटकेत असलेल्या एकबोटे यांना शिवाजीनगर न्यायालयमध्ये हजर करण्यात आल असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

You might also like
Comments
Loading...