भीमा कोरेगाव हिंसाचाराला राहुल गांधींनी धरल भाजप आणि संघाला जबाबदार

राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा: समाजात दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर राहिले पाहिजेत, हा संघ आणि भाजपच्या फॅसिस्ट विचारसरणीचा मुख्य गाभा आहे. उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीन घटना त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यावरून संघ आणि भाजपाच्या तीव्र दलितविरोधी विचारसरणीचे पुन्हा एकदा दर्शन झाल्याची टीका राहुल गांधी यांनी ट्विट करून केली आहे.

राज्यभरात सध्या भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेवरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. राजकीय वर्तुळातही या सगळ्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून भीमा कोरेगावच्या घटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला जबाबदार धरले.