fbpx

भीमा कोरेगाव घटनेचे विदर्भात सुद्धा पडसाद

st bus 1 web

खामगाव : भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटतांना दिसत आहेत. राज्यातील औरंगाबाद, अहमद नगर, नाशिक, पुणे नंतर विदर्भात सुद्धा वातावरण तापले आहे. विदर्भातील खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे हिंसाचाराचा निषेध म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री गवळी येथे एका एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
अकोला-नाशिक एमएच-१४ बीटी -३२७४ या बसवर दगडफेक केली असून दगडफेकीदरम्यान बसमध्ये २६ प्रवासी तसेच चालक आणि वाहक होते. या प्रकरणी चालकाने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे.

1 Comment

Click here to post a comment