भीमा कोरेगाव घटनेचे कोल्हापुरात तीव्र पडसाद

कोल्हापूर : भीमा कोरेगाव घटनेचा कोल्हापुरातही तीव्र पडसाद उमटला आहे. संतप्त जमावाने के. एम. टी. तसेच एस. टी. बसेस आणि वाहनांवर दगडफेक केली. तसेच संपूर्ण कोल्हापुरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काही ठिकाणी पोलीस आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बसंत-बहार रोड येथेही जमावाने दगडफेक केली. यावेळी एका डंपरवर दगडफेक करण्यात आली.