भीमा कोरेगाव प्रकरण हा पूर्वनियोजित कट – नवाब मलिक

Nawab-Malik

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरण हे अचानक घडलेले नाही तर हा पूर्वनियोजित कट होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा आम्ही आधी निषेध करतो.

गेले आठवडाभर त्या परिसरामध्ये काही समाजकंटकांकडून वातावरण तापविण्याचा प्रयत्न होत होता. वडू येथे गोविंद महार यांची समाधी काहींनी उध्वस्त केली याची माहिती पोलिसांना होती त्यामुळे त्यांना पोलिसांनी वाचविण्याचा प्रयत्न करु नये, असेही नवाब मलिक म्हणाले.

भीमा कोरे प्रकरणात संबंधितांची नुसती न्यायालयीन चौकशी करुन उपयोग नाही तर त्या संबंधित संघटनांच्या नेत्यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान समाजकंटकांचा उद्देश साध्य होईल, अशी परिस्थिती निर्माण करु नका शांतता राखा असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.