चंद्रशेखर आझादची तोफ प्रथमच राज्यात धडाडणार !

टीम महाराष्ट्र देशा : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या अमरावतीत आयोजित सभेला स्थानिक पोलिसांनी परवानगी दिली आहे. उद्या दुपारी 2 वाजता सायन्स कोअर मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. राज्यात चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला प्रथमच परवानगी दिली आहे.

दरम्यान, पुण्यातील भीम अर्मीची सभा रद्द करण्यात आली होती. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारल्यामुळे भीम आर्मीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण संस्थेनं परवानगी नाकाराल्यामुळे अखेर सभा रद्द करण्यात आली होती. तर, चंद्रशेखर आझाद यांना मुंबईतील मालाडच्या मनाली हॉटेलमध्ये नजरकैदेत देखील ठेवण्यात आलं होत.

You might also like
Comments
Loading...