बिर्याणी खाऊन भीम आर्मीने केला सुवर्णपदकासाठीच्या ‘त्या’ अटीचा निषेध

पुणे : पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंसमोरच बिर्याणी खात विद्यापीठाच्या वादग्रस्त सुवर्णपदकासाठीच्या शाकाहारी अटीविरोधात भीम आर्मीनं वेगळ्या पद्धतीनं आपला निषेध नोंदवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावानं सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

दरम्यान सुवर्णपदक हवंय तर मग शाकाहारी, निर्व्यसनी बना असं पत्रकच पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आता विद्यापीठ प्रशासनाकडून शेलारमामांच्या कुटुंबियांना शाकाहाराच्या संदर्भातील अट मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. शाकाहाराची अट काढण्यास मान्यता दिल्यास पुरस्कार पुढे सुरु राहील अन्यथा हा पुरस्कार कायमस्वरुपी रद्द करु अशी भूमिका अशी माहिती कुलगुरु नितीन करमळकर यांनी दिली आहे .