fbpx

वंचित बहुजन आघाडी युती-आघाडीविरोधात खिंड लढवत असताना भीम आर्मीचा आघाडीला पाठींबा

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीसाठी भीम आर्मीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीआरपी, रिपाइं, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकासआघाडी व मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे.कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

एका बाजूला वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस आणि भाजपविरोधात खिंड लढवत असताना भीम आर्मी कॉंग्रेसच्या बाजूने उभा राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्र आणि देशातील जातीयवादी,शेतकरीविरोधी,संविधानविरोधी सरकार हटविण्यासाठी भीम आर्मी पाठींबा देत असल्याचे म्हटले आहे.