भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची मध्यरात्री तुरुंगातून सुटका

टीम महाराष्ट्र देशा : सहारनपूर दंगलीप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासूका) अटक करण्यात आलेले भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची गुरुवारी मध्यरात्री तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच रावण यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी होण्याच्या भीतीनेच आपली सुटका करण्यात आल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

रात्री २ वाजून ४० मिनिटांनी त्याची सुटका करण्यात आली असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. सहारनपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर त्याला अटक करण्यात आली होती. हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये त्यांची सुटका करण्यात येणार होती, मात्र त्याआधीच त्याला सोडून देण्यात आलं आहे.

Shivjal