दादर स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून भीम आर्मी – आंबेडकर आमने-सामने

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई मधील चैत्यभूमी जवळील दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मीने केली असतानाच आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नामांतरास विरोध दर्शवला आहे.

Rohan Deshmukh

मध्य रेल्वेवरील दादर स्टेशनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मीने केली असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र नामांतरास विरोध दर्शवला आहे.
प्रकाश आंबेडकरांची नेमकी काय आहे भूमिका ?

मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सात बेटांचे हे शहर असून दादर, माहीम, कुलाबा अशा ठिकाणांचे नाव बदलू नये. नव्या पिढीसमोर या जागांचे ऐतिहासिक महत्त्व आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.दादर या भागाला ऐतिहासिक महत्त्व असून अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांची नावे बदलू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...