दलितांनी देशातील सर्व हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा : भीम आर्मी

blank

टीम महाराष्ट्र देशा- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत भगवान हनुमानाला दलित आदिवासी म्हटले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.या प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी दलित बांधवांनी देशातील हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा असे म्हटले आहे.

योगींच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रविवारी चंद्रशेखर यांनी देशातील सर्व दलित बांधवांनी देशातील हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा आणि आपल्या समाजाचे बांधव पुजारी म्हणून नियुक्त करावेत असे आवाहन केले.यापूर्वी अनुसूचित जमाती (एसटी) आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी उडी घेत हनुमान दलित नव्हे तर आदिवासी होते, असा दावा केला आहे.

दरम्यान,योगींचे हे वक्तव्य राजस्थान ब्राह्मण सभेला रुचलेले नाही. ब्राह्मण सभेने भगवान हनुमानांना जातीमध्ये विभागण्याचा आरोप करत योगी आदित्यनाथ यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे