fbpx

परवानगी अभावी संभाजी भिडे गुरुजींचे मुंबईतील व्याख्यान रद्द

संभाजी भिडे

मुंबई : पोलीस परवानगी न मिळाल्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे गुरुजींचे व्याख्यान तूर्तास रद्द करण्यात आल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई विभाग प्रमुख बळवंत दळवी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. भीमा कोरेगाव हिंसाचार व त्यानंतर राज्यभरात महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने उमटलेल्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली.

मुंबईतील लालबाग परिसरात रविवार, ७ जानेवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हे व्याख्यान पूर्वनियोजित होते. मात्र समाजातील काही घटकांकडून होणारा विरोध व कायदा सुव्यवस्था पहाता पोलिसांही परवानगी नाकारली.