शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या भिडे गुरुजींच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली

कोल्हापूर : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष भिडे गुरुजींच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. रायगडवर सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा याबाबत बैठक आयोजित केली होती. करवीर तालुक्यातील वडणगे गावात ही बैठक होणार होती. आता पोलिसांनी या बैठकीला नाकारली परवानगी आहे. दरम्यान, शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच बैठक होणार होती. पोलिसांनी कोरोनाचे कारण देत परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. अशा काळात राज्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, जत्रा, यात्रा, यांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार पोलिसांनी भिडेंच्या बैठकीला परवानगी नाकारली आहे.

दुसरीकडे प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्च 1 पर्यंत राज्यातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दररोज वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा कार्यक्रमात सहभागी होत असतात. पवार यांच्यासोबत अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात. सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या