भिडे गुरुजींसह एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणेमधील गुडलक चौकात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गात बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह सुमारे एक हजार जणांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
माऊलींची पालखी गुडलक चौकात आली असता संभाजी भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठान संघटनेच्या संबंधित वारकरी धारकरी नावाच्या गटातील लोक तलवारीसह पालखीत घुसले होते, पालखीत चालण्याच्या नावाखाली या लोकांनी घुसखोरी करत घोषणा बाजी केली यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड असतोष निर्माण झाला. हेच लोक गेल्या चार-पाच वर्षांपासून हा प्रकार करत असल्याची तक्रार या आधी ही करण्यात आली होती मात्र पोलीस प्रशासनाने कारवाई केली नव्हती. आज पुन्हा एकदा असाच प्रकार घडला त्यामुळे वारकऱ्यांनी संबंधित लोकांवर कारवाईची मागणी करत माऊलींची पालखी जागेवरच थांबवून ठेवली होती.  अखेर आज ( दि19) संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे