भिडे-एकबोटेंंना पुणे आणि शेजारच्या पाच जिल्ह्यात तडीपार करा : भीम आर्मी

पुणे : भीमा कोरेगाव येथील विजयाला २०१ वर्ष पूर्ण होत असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केले  जाणार आहे. ‘भीम आर्मी’तर्फे पुण्यात  ‘भीमा कोरेगाव संघर्ष महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे संबोधित करणार असून ३० डिसेंबर रोजी ही महासभा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे या दोघांना पुणे आणि शेजारच्या पाच जिल्ह्यात जिल्हाबंदी करावी अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. मागील वर्षी कोरेगाव भीमा इथे जी दंगल उसळली होती त्या दंगलीला कारणीभूत हे दोघेच असल्याचा आरोप देखील भीम आर्मीने केला आहे.

दरम्यान,दुसऱ्या बाजूला एल्गार परिषदेनंतर भीमा-कोरेगांव इथे उसळलेली दंगल लक्षात घेता भीम आर्मीच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी केली आहे. भीमा कोरेगांव दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाला पत्र लिहून एकबोटे यांनी ही मागणी केली आहे.