भिडे- एकबोटेंना वाचविण्यासाठीच भाजपाने स्वयंघोषित समिती स्थापन केली : संभाजी ब्रिगेड

पुणे : कोरेगाव भिमा प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी भाजपाने स्वयंघोषित समिती स्थापन केली असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. हि समिती मुख्य आरोपीवरुन लक्ष विचलीत करुन दिशाभूल करण्याचे काम करत असल्याचं देखील संभाजी ब्रिगेडने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या पत्रकात ? प्रमुख मुद्दे 

  • मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना वाचविण्यासाठी भाजपने ही सत्यशोधन समिती तयार केली आहे.
  • मुख्यमंत्री त्यांना निर्दोष असल्याचे सिद्ध करत आहेत. याचा अर्थ हा सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे हे सर्व सत्य असताना भाजपाची स्वयंघोषित सत्यशोधन समिती भिडे, एकबोटेंचे नाव न घेता एल्गार परिषद, संभाजी ब्रिगेड व परिवर्तनवादी संघटनांवर आरोप करुन संभ्रम निर्माण करीत आहे.
  • मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला तरी पोलीस त्यांना अटक करण्यास टाळाटाळ करत होते. मनोहर भिडेंना अद्याप अटक करण्यात आलेली नाही?
  • त्याचबरोबर एल्गार परिषदेत झालेली भाषणांचे व्हीडीओ उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी प्रक्षोभक वक्तव्य कोणीही केलेले नाही. सरकारवर टीका म्हणजे प्रक्षोभक होत नाही. त्यामुळे परिवर्तनवादी संघटनांवर जे आरोप समिती करीत आहे ते बिनबुडाचे आहेत.
You might also like
Comments
Loading...