भेंडी बाजार इमारत दुर्घटना; मृतांची संख्या ३४

bhendi bazar building accident

मुंबई : भेंडी बाजार इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ३४ झाली आहे . या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. बचावकार्य अजूनही सुरुच आहे. जखमींना जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बचावकार्य लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. बचाव कार्यासाठी कॅमे-याचा वापर केल्यामुळे ढिगा-याखालील तपास करणे सोपे जात आहे, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून सांगण्यात आले. बचावकार्यात पोलीसही आग्निशमन दलाच्या जवानांना आणि आपत्ती निवारण पथकाला मदत करत आहेत.