भय्यूजी महाराजांच्या मृत्यूला आयुषीचं जबाबदार; पोलिसांना मिळाले पत्र

blank

इंदूर : काही दिवसांपूर्वीच भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली होती, त्यांच्या आत्महत्तेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. अनेक तर्क – वितर्क लढवले जात होते, मात्र आता भय्यूजी महाराज यांच्याबाबत एक गुप्त पत्र पोलिसांच्या हाती लागल्याने या घटनेला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

डीआयजी हरिनारायणचारी मिश्र यांना गुरुवारी एक ११ पानांचं पत्र मिळालं. हे पत्र भय्यू महाराजांच्या एका ‘विश्वासू सेवका’नं पाठवल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आलाय. आपण भय्यू महाराज यांच्या मृत्यूचं गूढ जाणतो परंतु, आपल्या जीवाला धोका असल्यानं आपण स्वत:चं नाव जाहीर करू शकत नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय.

भय्यूजी महाराज यांच्या मृत्यूसाठी त्यांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी हीच कारणीभूत असल्याचं या पत्रात म्हंटले आहे.दिवंगत संत भय्यू महाराज यांच्या आयुष्यात कलह त्याच दिवशी सुरू झाला होता ज्या दिवशी त्यांनी डॉ. आयुशीसोबत विवाह केला होता. आयुषीनं पहिल्यांदा त्यांना कुटुंबीयांपासून तोडलं. त्यानंतर आश्रमात भाऊ, काकाला बोलावून घेतलं. मुलगी कुहूपासूनही त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आयुषीला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचं या पत्रात म्हंटले आहे.