का केली भय्युजी महाराजांनी आत्महत्या ? वाचा काय लिहिलयं सुसाईड नोटमध्ये

टीम महाराष्ट्र देशा: आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी असे टोकाचे पाउल उचलल्याने देशभरातून आश्चर्य व्यक्त केल जात. दरम्यान, त्यांच्या रूममधून सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये त्यांनी ‘आपण आयुष्यातल्या ताणतणावाला कांटाळलो आहे, हे ताणतणाव आता सहन होत नसल्याच’ लिहिले आहे, तसेच आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असही त्यांनी या चिट्ठीत लिहील आहे.

Loading...

अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी आज दुपारच्या सुमारास राहत असलेल्या रुममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यावेळी त्यांची पत्नी आणि आई घघरामध्ये उपस्थित होत्या. गोळी झाडल्याचा आवाज आल्याने त्यांच्या अनुयायांनी भय्यूजी महाराज असणाऱ्या रूमचा दरवाजा तोडत आत प्रवेश केला. दरम्यान, इंदोर मधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होत. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.

भय्यूजी महाराजांनी आत्महत्या का केली? त्यांनी हे टोकांच पाऊल का उचललं? यामागे काय कारण आहे याचे वेगवेगळे कयास लावले जात होते अखेर त्यांची सुसाईड नोट मिळाल्याने त्यांच्या आत्महत्ये कारण स्पष्ट झाले आहे.

भय्यूजी महाराज यांचा शेवटच ट्विट

BREAKING; गोळ्या झाडून घेत राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

 

मॉडेलिंग ते अध्यात्मिक गुरु; भय्यूजी महाराज यांचा थक्क करणारा जीवनप्रवासLoading…


Loading…

Loading...