सरकारने देऊ केला भय्यूजी महाराजांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या राजकारणात बराच बोलबाला असणाऱ्या भय्यूजी महाराजांना आता मध्यप्रदेश सरकारने राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊ केला आहे. राजकारणात अनेकदा मध्यस्थीची भूमिका पार पाडणारे भय्यूजी महाराज राज्यभर प्रचंड निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या देखील मागे असल्याच बोलल जात. तर गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं. अस असल तरी भय्यूजी महाराजांने हा प्रस्ताव स्वीकारला आहे का, याबाबत अजूनपर्यंत पुष्टी झालेली नाही.

मध्य प्रदेश सरकारकने भय्यू महाराज यांच्यासह पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. सरकारकडून सोमवारी परिपत्रक जारी करून यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. या संतांनी सरकारचा हा प्रस्ताव स्वीकारला तर यामध्ये महिन्याला ७५०० रूपये वेतन, सरकारी गाडी व १००० रूपयांचे डिझेल, १५००० रूपयांचा घर भत्ता, ३००० रूपये सत्कार भत्ता आणि सरकारी मदतनीस अशा सुविधांचा समावेश असेल.

You might also like
Comments
Loading...