‘राम मंदिरासाठी भीक मागत नाही, कायदा करा’; संघाचा भाजपला घरचा आहेर

टीम महाराष्ट्र देशा- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी राम मंदिरप्रश्नी अध्यादेश लागू करण्यासाठी मोदी सरकारवर दबाव आणण्याचे हिंदू संघटनांचे प्रयत्न सुरुच आहेत. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषदेचे ( VHP) हजारो कार्यकर्ते रामलीला मैदानावर धडकले. या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संबोधित केलं. ‘राम मंदिरासाठी भीक मागत नाही, कायदा करावा,’ असा म्हणत त्यांनी मोदी सरकारला अल्टिमेटम दिला.

न्याय मिळण्याबाबतच अविश्वास असेल असा देश प्रगती कशी करणार याचा विचार न्यायालयाने करत, यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा, असेही ते म्हणाले.

विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क अभियान सुरू केले आहे. परिषेदेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि काही राज्यापालांना भेटून आपली मागणी त्यांच्यापुढे ठेवली होती. आता ठिकठिकाणच्या मंदिर आणि मठात अनुष्ठान आणि प्रार्थना करण्यात येणार आहेत. तसेच साधुसंतांची धर्म परिषदही घेण्यात येणार आहे. शेवटची धर्म परिषद 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला होणार आहे.

राम मंदिरासाठी वटहुकूम काढून दाखवाच;ओवैसींचे भाजपला आव्हान

अयोध्येत रामाचं नव्हे तर गौतम बुदधांचं भव्य मंदिर उभारा : सावित्रीबाई फुले