fbpx

भाजपाच्या गळाला बविआ..?

bjp-lotus

पालघर – (रविंद्र साळवे) 2019 ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने आतापासूनच महाराष्ट्रातील राजकारण सर्वत्र ढवळून निघत आहेत अश्या परिस्थितीत पालघर लोकसभा मतदारसंघात सुद्धा निवडणुकांच बिगुल वाजले असून मोठ्या राजकीय उलथा-पालथीची शक्यता आहे आतापर्यंत बहुजन विकास आघाडीच्या भरवशावर बसलेली महाआघाडी आता पालघर लोकसभा सीपीएमला सोडण्याच्या मन:स्थितीत आहे. तसे झाल्यास बविआ रिंगणात नसेल आणि सीपीएम- भाजप अशी लढत होईल.

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न झाल्यास पालघरमध्ये शिवसेना, भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात सरळ तिरंगी लढत होईल असे चित्र आतापर्यंत आहे. युती झाली तरीही बविआ आणि भाजप यांच्यात थेट लढत होईल असा अंदाज होता, कारण बविआ ही महाआघाडीत सामील होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, खास राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेसाठी भाजपाला सहकार्य करण्याची राजकीय विनंती भाजपकडून बविआला करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

कोणत्याही परिस्थितीत लोकसभा गमवायची नाही, अशी भूमिका असलेल्या भाजपकडून बविआला गळाला लावले जात आहे. त्यासाठी गेल्या पोटनिवडणुकीत वापरली ती सर्व अस्त्रे वापरण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आपल्या हक्काचा लोकसभा मतदारसंघ बविआला निवडणुकीआधीच गमवावा लागण्याची शक्यता आहे.परिणामी बविआच्या भरवशावर असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीची धावपळ वाढली असून काँग्रेस राष्ट्रवादीमधील काही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र, खात्रीशीर पर्याय नसल्याने ही जागा सीपीएमला सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.