Bhavana Gawali | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या भावना गवळी (Bhavana gawali) काल अकोला रेल्वे स्थानकावर आमने-सामने आले. यावेळी ठाकरे-शिंदे (Thackeray-Shinde) गट समोरा-समोर आल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी गद्दार, गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या. भावना गवळी तोंडावर ‘गद्दार-गद्दार’, ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे भावना गवळी प्रचंड संतापल्या आहेत. गवळी यांनी विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भावना गवळी म्हणाल्या, “विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी चिथावणी दिल्यामुळे माझ्याविरोधात घोषणाबाजी झाली. अशी कृती त्यांच्या पत्नीबद्दल आणि बहिणीबद्दल केली असती तर ते पाहत उभे राहीले असते का?. त्यामुळे मी अकोला पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल व्हावे आणि अटक व्हावी.”
“मी अकोला स्टेशनवरुन मुंबईसाठी येत असतांना ही घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित कार्यकर्ते माझ्या अंगावर आले. माझा जीव जाईल अशा पद्धतीचे त्यांचे कृत्य होते. अत्यंत नीच वर्तन त्यांचं होत. हे सगळं काम विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांनी केले आहे. त्या मॉबमध्ये माझा जीव देखील केला असता,” असे भावना गवळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | हिवाळ्यामध्ये सकाळी केळी खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Supriya Sule | “ईडी सरकार हे इंग्रजांचं सरकार वाटतंय”; सुप्रिया सुळेंची खोचक टीका
- NCP | शिंदे-फडणवीसांनी केलेल्या अगणित दिल्ली वाऱ्या पूर्णपणे निष्फळ ; राष्ट्रवादीची टीका
- Sanjay Pawar | “कोणाचा बाप आला, तरी आम्ही एक इंचही…”; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून शिवसेनेचा हल्लाबोल
- Suryakumar Yadav | ICC टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव नंबर 1 वर कायम