भावना गवळींना ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात हजर राहणार?

भावना गवळींना ईडीच्या तिसऱ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात हजर राहणार?

Bhawana Gawali

मुंबई : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (mp Bhavana Gawli) यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. भावना गवळी यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावले आहे. भावना गवळी शुक्रवारी ईडी (ED) कार्यालयामध्ये चौकशीला हजर राहण्याची शक्यता वर्कवली जात आहे.

भावना गवळी यांना सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, याआधी ईडीने तीन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते, मात्र त्या ईडीसमोर हजर झाल्या नाहीत. तर कालच सईद खान (Said Khan) यांच्याशी संबंधीत पावणे 4 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ED) टाच आणली. सईद खान हे खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

गवळी यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. याअंतर्गत ईडीने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली होती. सईद खान यांच्या चौकशीत बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे गवळी यांना याआधी समन्स बजावले आहेत. गवळी चौकशीला अनुपस्थित राहिल्या होत्या.

वाशिम-यवतमाळ येथे टाकलेल्या छाप्यांमध्ये ईडीनं अनेक कागदपत्रे जप्त केली होती. भावना गवळीशी संबंधित 5 संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्याशिवाय, गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यालयातून 7 कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गवळी यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली होती. तेव्हापासून ईडीच्या कारवाईला वेग आला आहे.

महत्वाच्या बातम्या