भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलीसात तक्रार दाखल !!

पुणे – भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईट वरून भाऊसाहेब रंगारी यांचे अचानक नाव काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ऊर्फ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपती ट्रस्ट ने पोलिस आयुक्त पुणे, पोलिस निरीक्षक सायबर सेल पुणे यांच्या कडे पुणे महानगरपालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी जमावबंदी चे आदेश दिले होते. व स्वातंत्र्याचा लढा त्या वेळी जोरात चालू होता. लोकांनी एकत्र येऊन काहीतरी करणे गरजेचे झाले होते व तत्कालीन क्रांतिकारकांची बैठक भाऊसाहेब रंगारी यांच्या बुधवार पेठ सध्याचे रंगारी भवन येथे पार पडली होती व घरातला गणपती सर्वाजानिकरीत्त्या रस्त्यावर बसवून ऊत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरले व त्यानुसार सर्वात प्रथम इ सन 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणपती सार्वजनिक रित्या बसविला व उत्सव साजरा केला.

1894 मध्ये लोकमान्या बाळ गंगाधर टिळक यांनी प्रथम पुणे येथे विंचूरकर वाड्यात गणपती बसविला. व त्यानंतर गणपती ऊत्सवाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार केला.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी व टिळक दोघांचा उद्देश ब्रिटिश राजवटी विरूध्द व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा ऊभा करायचा हाच होता. त्यामुळे भाऊसाहेब रंगारी हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक आहेत त्यांचे श्रेय त्यांना मरणोत्तर मिळावे व खरा इतिहास बाहेर यावा यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट काही वर्षं प्रयत्न करत आहे.

भाऊसाहेब रंगारी यांनी त्या काळात ईको फ्रेंडली मुर्ती बनविली तीच आजही बसविली जाते. फक्त आणि फक्त क्रांतीच्या संकल्पनेतून उभारलेल्या गणेशोत्सवाचे प्रतिक म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब यांनी साकारलेली दृष्ट प्रवृत्तीशी दोन हात करणारी श्रींची ईको फ्रेंडली लढाऊ काव्यातील मूर्ती.

आशीर्वाद देण्यासाठीचा हात ही संकल्पनाच यावेळी राबवली गेली नाही, कारण जे काय ते लढूनच घ्यायचे आहे. आणि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ज्या संकल्पनेतून गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी आणि या त्यांच्या सोबत्यांनी अवलंबला त्याच शिकवणीतून आजच्या काळातही उभारलेल्या संविधानिक लढ्याला यश आले म्हणावे लागेल.

पुणे महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती सार्वजनिक गणेशोत्सवाचे खरे जनक म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांची नोंद केली असून गणेशोत्सवाचे साल १८९२ च नमूद केले आहे त्यामुळे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे पुणे महानगरपालिकेचे काल महापालिकेत झालेल्या बैठकीत आभार मानले व लगेचच त्याच रात्री बारा च्या सुमारास महानगरपालिकेच्या वेबसाईट वरून 1892 सालात भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली असा मजकूर होता हा मजकूर अचानक काढून टाकण्यात आला.

महानगरपालिकेच्या या कृत्या विषयी व ईतिहासाची मोडतोड केली, खोटा इतिहास पसरविला, खरा इतिहास लपवून ठेऊन समाजाची दिशाभूल केली म्हणून पोलीस आयुक्त पुणे, पोलीस निरीक्षक सायबर सेल, महापालिका आयुक्त, महापालिका सायबर सेल प्रमुख व महापौर यांचेकडे रितसर तक्रार दाखल केली आहे अशी माहिती भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे कायदा सल्लागार अॅड मिलींद द पवार व भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने सचिव राजेन्द्र गुप्ता विश्वस्त सुरज रेणुसे विश्वस्त बाळासाहेब निकम यांनी कळविले आहे.