fbpx

विखे-पाटील समर्थक आमदाराला कॉंग्रेसने दिली शिर्डीतून उमेदवारी

टीम महाराष्ट्र देशा – सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे हे आघाडीकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला शिर्डी मतदारसंघातून कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी काँग्रेसकडून राज्यातील दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यात भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाऊसाहेब कांबळे हे विखे समर्थक समजले जातात. सुजय यांच्या भाजपप्रवेशानंतर विखेंनी नगरमध्ये कोणाचाच प्रचार न करण्याची भूमिका केली होती, मात्र आता त्यांचे समर्थकच शिर्डीतून रिंगणात आघाडीकडून उतरविण्यात आल्याने विखे काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.