मराठा आरक्षणासाठी आणखी एका मराठा आमदाराचा राजीनामा

bhausaheb chikatgaonkar

औरंगाबाद- मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर या आमदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हे राष्ट्रवादीचे पहिले आमदार ठरले आहेत. या अगोदर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता.

मराठा आरक्षणाावरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागलंय. मराठा मोर्चेकऱ्यांकडून मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक तिरड्या उचलल्या जात आहेत.

दरम्यान,मराठा आंदोलकांशी सरकार चर्चेस तयार आंदोलकांना शांतता राखावी अस आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. मराठा समाजाच्या शांततापूर्ण मोर्चाची सरकारने दखल घेतल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही 18 जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची माफी मागावी : अशोक चव्हाण