आता तुम्हाला ठेचू; भाऊ रंगारी गणपती ट्रस्टला धमकीचे पत्र 

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून सुरु झालेल्या वादाला आता वेगळच वळण लागत असल्याच दिसून येत आहे. भाऊ रंगारी गणपती ट्रस्टला आज एक धमकी पत्र मिळाले असून त्यामध्ये ट्रस्टच्या विश्वस्तांकडून करण्यात येणाऱ्या मागण्या ह्या निराधार्त असून हि मागणी बंद न केल्यास तुम्हाला ठेचल जाईल अशी धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी हे पत्र भाऊ रंगारी ट्रस्टला मिळाले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी कि लोकमान्य टिळक असा वाद सध्या पुण्यात पहायला मिळत आहे. पुणे महापालिकेकडून यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचा शतकोत्तर रोप्य महोत्सव साजरा केला जात आहे. यावर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टकडून आक्षेप घेण्यात आला. दरम्यान हा वाद आता थेट न्यायालयात गेला असून भाऊ रंगारी ट्रस्टकडून उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या वादावर समिती नेमण्याची मागणी करण्यात आली असून या याचिकेवर उद्या सुनावणी होणार.

काय आहे पत्र 

dhanki letter to bhaurangari

You might also like
Comments
Loading...