Share

Bhaskar Jadhav | उद्धव ठाकरेंनी शिवसेना बाळासाहेबांपेक्षा दोन पावलं पुढे नेली – भास्कर जाधव

Bhaskar Jadhav | मुंबई :  नवी मुंबईत कार्यकर्त्यांवरील पोलीस कारवाईविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानं निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाषण केलं. तसेच बोलत असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

उद्धव ठाकरेंनी खूप कल्पकतेनं, संयमीपणे आणि खूप नियोजनबद्धरित्या बाळासाहेबांपेक्षा शिवसेना दोन पावलं पुढं नेण्याचं काम केलं असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल समाजात शंका-कुशंका पद्धतशीरपणे निर्माण करणं त्यासाठी वेगवेगळ्या पतळीवर टीकाटिप्पणी करण्याचं काम सातत्यानं सुरु होतं. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव गोठवण्याचं काम झालं. पण आता मशाल चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत, असं देखील ते म्हणाले.

आपली धनुष्यबाण ही निशाणी गोठली, शिवसेना हे नावही गोठवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर आपल्याला मशाल हे चिन्ह मिळालं. आपल्या शिवसेनेला सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालेलं आहे. उद्धव ठाकरेंना अनेकांनी शुभेच्छा दिल्या, तशाचप्रकारे एक सामान्य शिवसैनिक म्हणून मीही शुभेच्छा दिली. त्यांना सांगितलं, शिवसेना नाव गोठवण्याचा प्रयत्न झाला याचं दु:ख तर आहेच, शिवसेनाप्रमुखांच्या देवाऱ्यात असेलली धनुष्यबाण ही निशाणी, जे धनुष्यबाणाच्या नावाने मोठे झाले त्यांनीच गोठवण्याचं महापाप केलं. याचं दु:ख तर तुम्हाला आहेच. पण मला असं वाटतं नियतीने तुमच्यासाठी नवीन दार उघडलेलं आहे, की उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने आता जे काही शिवसेनेचं बरं वाईट होईल. ते तुमचं असेल. यासाठी तुम्हाला नवीन संधी दिलेली आहे. नव्या शिवसेनेचा जन्म झालेला आहे. तुमच्या नेतृत्वात नवीन शिवसेना उभी करावी लागणार आहे.

शिवसैनिकांना आवाहन करताना जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले की, आज ज्या पद्धतीने एखाद्याला तडीपारीच्या नोटीस दिल्या जात आहेत. कोणावर ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभागाची कारवाई केली जात आहे. आमचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा काय दोष आहे. 50 कोटी एकेकाला तुम्ही दिलेत आणि 55 लाखांसाठी तुम्ही त्यांना तुरुंगात बसवलयं. त्यांनाही तुम्ही शिवसेना सोडा नाहीतर खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागेल, असं म्हटलं होतं. पण संजय राऊतांनी सांगितलं की मोडेन पण वाकणार नाही आणि शिवसेना व उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वांना पुन्हा एकदा त्यात हिंमतीने ताकदीने उभा रहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Bhaskar Jadhav | मुंबई :  नवी मुंबईत कार्यकर्त्यांवरील पोलीस कारवाईविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानं निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now