Share

Bhaskar Jadhav | “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं होत, संपूर्ण भाषण वाचून झाल्याशिवाय…” ; भास्कर जाधव यांची खोचक टीका

मुंबई : ४ ऑक्टोंबर रोजी शिवसेना (Shivsena) पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोन वेगळ्या ठिकाणी दसरा मेळावे आयोजित केले. यावेळी एकनाथ शिंदेंच्या भाषणावर अनेकांनी टीका. अशातच ठाण्यातील एका कार्यक्रमात मिमिक्री करत भास्कर जाधव यांनी देखील निशाणा साधला. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा देखील उल्लेख केला आहे.

भास्कर जाधव यांचा घणाघात –

देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सांगितलं होतं, संपूर्ण भाषण वाचून झाल्याशिवाय मान वर कराल तर याद राखा, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला आहे. यावेळी उद्धव ठाकरेंच्या मनक्याचं ऑपरेशन झालय त्यांना वाकता येत तरी त्यांनी ताठ मानेने भाषण केलं, असं देखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेच्या भाषणाची नकल देखील केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे –

काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. ज्यांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या, ते नाराज होऊन गेले. असं उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात म्हणाले होते.

पण ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, ते तुम्ही सर्व आजही माझ्यासोबत निष्ठेने आहात हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या-दुकट्याची नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. तुम्ही ठरवणार आहात की मी पक्षप्रमुख राहायचं की नाही. एकाही एकनिष्ठानं सांगावं की निघून जा, मी आत्ता निघून जाईन. पण तुमच्यापैकी एकानं सांगायला हवं. गद्दारांनी सांगायचं, अस देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ४ ऑक्टोंबर रोजी शिवसेना (Shivsena) पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now