(Bhaskar Jadhav) सिंधुदूर्ग : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केलीय. शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भादरत होता का? असा खोचक सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.
“नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचे सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रदेखील विचारत नाही. शिवसेनेने काही केले नाही, असे नारायण राणे म्हणतात. मग मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस तू काय म्हशी भादरत होतास का?” अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडले. यावेळी नितेश राणेंचा एकेरी उल्लेख करत भास्कर जाधव यांनी टोला लगावला आहे. “काल नितेश राणे चिपळूणमध्ये बोलताना माझ्यावर मनसोक्त टीका करून शेवटी म्हणतो ‘माझं एवढं भाषण ऐकल्यानंतर मी लिहून देतो भास्कर जाधव घरातून बाहेर पडणार नाही, घरात लपून बसेल’. मग आज इथे आलेली ही काय तुमची औलाद आहे का?” असं भास्कर जाधव म्हणाले.
“नारायण राणे देशाचे मंत्री पण गल्लीत त्यांना कुणी विचारत नाही, उद्धव ठाकरे तर राणेंचं कधी नावही घेत नाही. पण ठाकरेंची सभा पार पडली रे पडली, की राणेंनी प्रेस घेतलीच म्हणून समजा, एवढी कोंडबीचोराची वाईट अवस्था झालीय”, अशा शब्दात भास्कर जाधवांनी राणेंची खिल्ली उडवली.
भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखाना
नारायण राणेंवरील आरोपांबद्दल बोलताना भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखाना झाल्याचं भास्कर जाधव म्हणाले. “या तुमच्या जिल्ह्यातले कोंबडीवाले. त्यांनी रे रोडला एक प्रकल्प उभा केला. त्यात ३०० कोटींचा भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर ईडीची कारवाई व्हावी, म्हणून किरीट सोमय्यांनी तेव्हा आरोप केले होते. आज मंत्रीमंडळात बसलेले ५० टक्के लोक, मंत्रीमंडळाबाहेर आमदार असणाऱ्या लोकांवर भाजपाकडून असेच आरोप केले जात होते. पण तेच लोक भाजपात गेले आणि एकदम साफ, स्वच्छ झाले. भाजपाच्या घराघरात निरमा पावडरचा कारखानाच तयार झाला आहे”, असं म्हणत भास्कर जाधवांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचे सांगितले. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Chitra Wagh । “नाच्या, सुपारीबाज, भाडोत्रींच्या….” ; चित्रा वाघ भास्कर जाधवांवर चांगल्याच संतापल्या
- Travel Tips | भारतात ‘या’ ठिकाणी होऊ शकते तुमची बजेट ट्रीप
- Bhaskar Jadhav । संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; म्हणाले…
- Viral Video | सायकलवर चित्तथरारक स्टंट करणाऱ्या ‘या’ तरुणाचा पाहा व्हिडिओ
- Ajit Pawar । “नव्याचे नऊ दिवस असतात मान्य, पण..”; अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा