चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र बघायला मिळाले. तद्पश्चात राणा दाम्पत्यास अटक झाली. तसेच याप्रकरणी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भास्कर जाधव म्हणाले की,“हनुमान चालीसा वाचून जर बिघडलेली संपूर्ण परिस्थिती सुधारणार असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाच. म्हणजे लोकांना पंतप्रधानांनी कबूल केल्याप्रमाणे १५-१५ लाख रुपये मिळतील.”
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,“कोण हा रवी राणा?, बाळासाहेबांनी तुझ्यासारख्या फडतूस माणसाला शिवसैनिक कधीच करून घेतला नसता.” तसेच तू भाजपचा समर्थक आहे, शिवसेनेची काळजी तू कशाला करतोस?, असा सवालही जाधव यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<