Share

Bhaskar Jadhav | ठाकरे गटाला मिळालेल्या चिन्ह आणि नावावर भास्कर जाधावांनी दिली प्रतिक्रिया

मुंबई : निवडणूक आयोगाने चिन्ह गोठावल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालं होतं. त्याचबरोबर आता ठाकरे आणि शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नावं मिळणार यावरही अनेक तर्क वितर्क केले जात होते. परंतू काही तासांपूर्वीच निवडणूक आयोगाने कोणत्या पक्षाला कोणतं चिन्ह आणि काय नाव मिळालं आहे, हे सांगितलं आहे. जाहीर केलेल्या निर्णयानूसार ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे आणि ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. अशातच ठाकरे गटाला मिळालेल्या नाव आणि चिन्हावर शिवसेना पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले भास्कर जाधव ?

पहिल्याच प्रयत्नात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्णपणे जिंकले आहेत. आम्हाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळालं आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंचंही नाव राहिलं, बाळासाहेब ठाकरे हेही नाव राहिलं असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

आम्ही आनंदी आहोत, पूर्णपणे समाधानी आहोत. कारण आमच्या बाळासाहेबांचं नाव चोरण्याचं अनेकजण प्रयत्न करत होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे नाव आमच्याकडे राहिलं. बाळासाहेब हे नाव बंडखोरांकडे गेलंय. मात्र, उद्धव, बाळासाहेब, ठाकरे ही तिन्ही नावं आमच्या मूळ शिवसेनेकडे राहिले. हा आमचा सर्वात मोठा विजय आम्ही मानतो, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. भास्कर जाधवांनी केलेल्या वक्तव्यावरून असं वाटतं आहे की, त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटावार चांगलाच हल्ला केला आहे.

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे नाम ही काफी हैं. मशाल चिन्ह मिळालं याचा आनंद आहे” असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “ही मशाल अन्याय, अत्याचाराविरोधात, जटिल राजकारणाविरोधात, कट कारस्थान करणाऱ्यांविरोधात पेटत राहील” असं त्या म्हणाल्या. यावेळी पुढे ही मशाल गोरगरीबांच्या झोपड्यांमधील अंधार दूर करण्यासाठी, अन्यायाचे निवारण करण्यासाठी कायम धगधगत राहील, असं शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधेरी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : निवडणूक आयोगाने चिन्ह गोठावल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गरम झालं होतं. त्याचबरोबर आता ठाकरे आणि शिंदे गटाला कोणतं चिन्ह …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now