संभाजी भिडेंच्या सभेला भारिपचा विरोध

अहमदनगर : श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे संभाजी भिडे गुरुजी यांची रविवारी शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. ते जातीयद्वेष पसरवुन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत असा आरोप करत त्यांच्या सभेला परवानगी न देण्यासाठी मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली.

रविवार, दि.१० जून रोजी शहरातील पटेल मंगल कार्यालयात संभाजी भिडे गुरुजी यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे. या सभेत जातीय तेढ निर्माण होण्याच्या उद्देशाने ते बोलणार असून, त्यांच्या सभेला प्रशासनाने परवानगी देवू नये, तसेच भिडे गुरुजींवर देशद्रोहाचा खटला भरण्याची मागणी भारिप बहुजन महासंघाकडून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.