fbpx

भारिपने दंड थोपटले , लोकसभेसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार जाहीर

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष उमेदवारी जाहीर करत आहे त्याप्रमाणेच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली असून गुणवंत देवपारे हे लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवार असणार आहेत. वंचित बहुजन आघाडी महासंघाची जाहीर सभा रविवारी अमरावती येथे पार पडली त्यावेळी त्यांनी गुणवंत देवपारे यांना उमेदवारी जाहीर केली.

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत जाण्याची तयारी आहे असे प्रतिपादन देखील केले. तसेच आंबेडकर म्हणाले कि , आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे. तसेच आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण चर्चा करायची असेल तर लगेच करा, आम्ही वाट पाहणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीला आमची गरज आहे. आम्ही काँग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे, मात्र आम्ही त्यांच्या भरवश्यावर नाही, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.