भाजप सरकार दंगली घडवणारं सरकार ; आंबेडकरांचा पुनरुच्चार

Prakash ambedkar

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकार दंगली घडवणारं सरकार आहे, अशा शद्बात भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीका केली. बीडमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने सत्ता निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला प्रकाश आंबेडकर यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण माने आणि एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.

भाजप आणि आरएसएसचा इतिहास हा दंगली घडवण्याचा इतिहास आहे. हे दंगली घडवणारं सरकार असून या सरकारला देशातील जनतेची चिंता नाही. दुष्काळामुळे सध्या राज्यात गंभीर स्थिती निर्माण झालेली असताना हे सरकार दुष्काळग्रस्त भागात कोणत्याही उपाययोजना करत नाहीये. त्यामुळे सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. महाराष्ट्रातील सरकार भ्रष्टाचार विरोधी सरकार आहे म्हणून सांगितल जातं. मात्र भाजप सरकारने भ्रष्टाचाराच्या नावावर 41 योजना बंद केल्या. आजाऱ्याल्या बरा करण्यापेक्षा त्या आजाराला फाशी देणारा हे सरकार आहे, असंही ते म्हणाले.