मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ विश्वासू सहकाऱ्याने घेतली राज ठाकरेंची भेट ; वेगवेगळ्या चर्चांना उधान

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी, राजकीय दौरे यासारख्या घडामोडींना सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेते मंडळी पक्षांतर करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंज वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. मात्र लाड यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

लाड म्हणाले, आपले आणि राज ठाकरे यांचे पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. वारंवार आमच्या भेटी होत असतात. त्यात राजकारण नाही, असे लाड यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना म्हणाले, राज ठाकरे हे गेल्या पाच वर्षांपासून भाजपवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करताहेत. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. तर ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिलंय.

दरम्यान, प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला गळती लागली आहे. पक्षांतरामुळे पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या