दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर

टीम महाराष्ट्र देशा : महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपने त्यांना महापौरपदाची उमेदवारी दिली होती. त्यांनी २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेनेनेही भाजपला समर्थन दिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.

अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची निवड निश्चित झाली होती, केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. आज सोमवारी निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी निवडीची घोषणा केली.

Loading...

भारती सोनवणे ह्या उपमहापौर राहिलेल्या आहेत. त्या भाजप नेते स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी आहेत. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून कैलास सोनवणे यांची ओळख आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांची रणनीती यशस्वी झाली होती. भाजपने महाविकास आघाडीला सुरुंग लावत जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलवलं. अध्यक्षपदी रंजना पाटील तर उपाध्यक्षपदी लालचंद पाटील विजयी झाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
जाणून घ्या, नाथाभाऊंच्या एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपविले त्या दिवशी नेमकं काय घडलं ?