इंधन दरवाढीविरोधात ‘भारत बंद’ची हाक

टीम महाराष्ट्र देशा – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत.

इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ‘भारत बंद’च्या माध्यमातून केला जात आहे.

‘भारत बंद’ला हिंसेचे गालबोट,अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक