fbpx

इथे लग्न जुळवले जातील; संमतीविना भाजप नगरसेवकाच्या लग्नाचे फोटो ‘भारत मॅट्रिमोनी’वर

bharat matrimoney

पुणे: आजच्या डिजीटल युगामध्ये कोणत्याही गोष्ठीसाठी ऑनलाईन सर्च सर्वात आधी केला जातो. मग ते भाजी खरेदी असो कि घर. आजकाल विवाहासाठी जोडीदार देखील ऑनलाईन शोधला जातो. लग्न जुळवण्याचा दावा करणाऱ्या शेकडो वेबसाईट आपल्याला ऑनलाईन पहायला मिळतात.

आता अशीच एक मॅट्रिमोनियल साईट अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे ते लग्न न जुळवताच वापरलेला भाजप नगरसेवकाच्या लग्नाचा फोटो. पुण्यातील भाजप नगरसेवक असणारे सम्राट थोरात यांच्या कोणत्याही परवानगी शिवाय भारत मॅट्रिमोनीने त्यांच्या लग्नाचे फोटो जाहिरात म्हणून वापरले आहेत. आपल्या आयुष्यातील खाजगी सोहळ्याचा व्यावसायिक वापर करुन फसवणूक केल्याचा आरोप करत थोरात यांनी भारत मॅट्रिमोनी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

सम्राट थोरात हे पुण्यातील गुरुवार पेठ भागातून नगरसेवक आहेत. तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या या शिवसेनेचे माजी नगरसेवक अजय भोसले यांच्या कन्या आहेत, सम्राट आणि ऐश्वर्या यांचा विवाह 15 मे 2015 रोजी झाला होता. दोन्हीकडील कुटुंबीयांनी हे लग्न जमवले होते. ना कि भारत मॅट्रिमोनीने.

दोन्ही कुटुंबीयांनी लग्न जुळवले असताना भारत मॅट्रिमोनी वेबसाईटवर हे अग्न आपण जुळवल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, एका मित्राने फोटो पहिल्यानंतर हि गोष्ठ समोर आली असून सम्राट थोरात यांनी भारत मॅट्रिमोनीचे मॅनेजर आणि आयकॅफे मॅनेजरविरोधात तक्रार दाखल केली आहे.