fbpx

सलमानच्या ‘भारत’ची यशस्वी घौडदौड; अवघ्या पाच दिवसात केली ‘एवढी’ कमाई

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ चांगली कमाई करताना दिसत आहे. दिवसेंदिवस कमाईचा आलेख वाढताना पाहायला मिळत आहे. सलमान खान आणि कैटरीना कैफचा भारत चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत आहे.

सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाने पहिल्या दिवशी- ४२.३०, दुसऱ्या दिवशी- ३१, तिसऱ्या दिवशी- २२, आणि चौथ्या दिवशी- २६ करोड एवढी कमाई केली आहे. सलमान खान, कैटरीना कैफ, आणि दिशा पटानी यांचा चित्रपट ‘भारत’ने पाचव्या दिवशी तब्बल २५-२६ करोडची कमाई केली आहे. आता हा आकडा १५० करोडपर्यंत पोहचला आहे.’भारत’ चित्रपटाने पाच दिवसात १४४ करोडची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईची माहिती बॉक्स ऑफिस इंडियाने दिली.