‘भारत बंद’ला हिंसेचे गालबोट,अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक

bharat band1

टीम महाराष्ट्र देशा- दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली असून मध्य प्रदेशमधील मुरैना येथे या बंदला हिंसक वळण लागले. मुरैनात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुरैनासह ग्वाल्हेर तसेच सागर जिल्ह्यात कलम १४४ लागू (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. मात्र, मोदी सरकारनं कोर्टात कमकुवत बाजू मांडल्यानं हा निर्णय दिला गेला, असा आरोप विरोधकांचा आहे.

Loading...

पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून तिथे शाळा, औद्योगिक कार्यालये बंद आहे. पंजाबमधील सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे आज होणारे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.बिहारच्या फोरबीसगंज येथे आंदोलकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केले.राजस्थानच्या बारमेरमध्ये आंदोलकांनी गाडया पेटवून दिल्या, मालमत्तेचे नुकसान केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाडयांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.पंजाबच्या पितयाळामध्ये आंदोलकांनी ट्रेन रोखल्या.

नंदुरबारमध्ये आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद नसल्यानं संघटनांकडून बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. तर तिकडे बिहारमध्ये रेले रोको करण्यात आला.मुंबई आणि महाराष्ट्रात याचा काय परिणाम होतो, हे देखील आज महत्वाचं आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत