भारत बंद :लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील : प्रकाश आंबेडकर

prakash aambedkar 1

पुणे- दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली असून या बंदला हिंसक वळण लागले आहे.  आज जो भडका उडाला आहे त्याला सुप्रीम कोर्ट आणि शासनच जबाबदार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे. सामान्य जनतेला विचारात न घेता निर्णय घेतल्यामुळे आज हे सर्व घडत आहे.देशात सीरिया सारखं वातावरण निर्माण होतअसून देशात आज काही ठिकाणी हिंसाचार झाला त्याला सर्वस्वी सुप्रीम कोर्ट जबाबदार.शासनाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असून जर हस्तक्षेप केला नाही तर लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील आणि त्यास शासनच जबाबदार असेल असा इशारा देखील आंबेडकर यांनी  दिला .

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
सोशल मीडियावर भारत बदची हाक दिली गेली, बंद कोणी पुकारला हे माहीत नाही, मात्र लोकांमध्ये असणारा असंतोष यातून बाहेर येत आहे. आधी सरकार राजकीय पार्टी दलितांच्या भावनांशी खेळ खेळायच्या मात्र आता सुप्रीम कोर्ट हा खेळ खेळत आहे. मीडिया बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, हे थांबणं गरजेच आहे.सामान्य जनतेला विचारात न घेता निर्णय घेतल्यामुळे आज हे सर्व घडत आहे.देशात सीरिया सारखं वातावरण निर्माण होतअसून देशात आज काही ठिकाणी हिंसाचार झाला त्याला सर्वसी सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे. या सर्व उद्रेकातून लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील.आज जो भडका उडाला आहे त्याला शासनच जबाबदार आहे.

Loading...

दरम्यान दलित अत्याचारविरोधी कायदा बोथट झाल्याप्रकरणी दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली असून मध्य प्रदेशमधील मुरैना येथे या बंदला हिंसक वळण लागले आहे. मुरैनात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुरैनासह ग्वाल्हेर तसेच सागर जिल्ह्यात कलम १४४ लागू (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.अॅट्रॉसिटी दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. मात्र, मोदी सरकारनं कोर्टात कमकुवत बाजू मांडल्यानं हा निर्णय दिला गेला, असा आरोप विरोधकांचा आहे.

पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून तिथे शाळा, औद्योगिक कार्यालये बंद आहे. पंजाबमधील सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे आज होणारे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.बिहारच्या फोरबीसगंज येथे आंदोलकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केले.राजस्थानच्या बारमेरमध्ये आंदोलकांनी गाडया पेटवून दिल्या, मालमत्तेचे नुकसान केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाडयांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.पंजाबच्या पितयाळामध्ये आंदोलकांनी ट्रेन रोखल्या.

नंदुरबारमध्ये आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद नसल्यानं संघटनांकडून बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. तर तिकडे बिहारमध्ये रेले रोको करण्यात आला.मुंबई आणि महाराष्ट्रात याचा काय परिणाम होतो, हे देखील आज महत्वाचं आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाऊ शकते, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
उद्धवची आणि संज्याची औकात काढली त्याबद्दल उदयनराजेंच अभिनंदन:निलेश राणे
संज्या म्हणजे लुक्का;संज्या राऊत म्हणजे 'पिसाळलेला कुत्रा':निलेश राणे
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
'अजित पवार हे सध्याच्या मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री असून ते  कामाला वाघ आहेत'
नितेश राणेंची जीभ घसरली संजय राऊतांवर केली अश्लाघ्य भाषेत टीका
'हा देश मोदी आणि अमित शाह यांच्या बापाचा नाही'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही, आज सातारा बंद