युतीतील घडामोडींवर आहे ‘या’ माजी पोलीस अधिकाऱ्याचे आहे बारीक लक्ष

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना गळाला लावण्यासाठी कुरघोडीचे राजकारण जोरात रंगताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रशासनात काम केलेले अधिकारी देखील राजकारणात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. पुणे पोलीस दलातून नुकतेच निवृत्त झालेले पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता भानुप्रताप बर्गे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बर्गे यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे बर्गेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.जागावाटपात कोणता मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार यावर सध्या बर्गे यांचे बारकाईने लक्ष आहे तर तिकीट मिळणार असेल तरच बर्गे निवडणूक लढवतील असं देखील राजकीय जाणकारांचे मत आहे.

आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे बर्गे यांच्या नावावर ४०० हुन अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारआहेत. पुणे शहरात काम करत असताना सर्व पक्षातील नेत्यांशी त्यांचा संपर्क राहिलेला आहे. आता निवृत्तीनंतर त्यांना राजकारणाचे वेध लागल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातुन भाजप अथवा शिवसेनेकडून ते लढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या